|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » आज अवघी डिचोली बनणार शिवमय डिचोलीत घुमणार छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा

आज अवघी डिचोली बनणार शिवमय डिचोलीत घुमणार छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा 

  रविराज च्यारी. डिचोली :

   “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”च्या घोषणांनी आज मंगळ. दि. 19 फेब्रु. रोजी डिचोली दुमदुमून उठणार आहे. शिवजयंतीदिनी डिचोली शहराच्या मोक्मयाच्या ठिकाणी स्थापन होणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाने डिचोलीतील समस्त शिवप्रेमींच्या स्वप्नाची पुर्तता होणार असून दिवसभर शिवजयंती निमित्त होणाऱया कार्यक्रमांनी अवघा भतग्राम महाल “शिवमय” बनणार आहे. अश्वारुढ पुतळय़ाच्या स्थापनेची तयारी तर जोरदारपणे सुरू आहे.

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या डिचोली भतग्राम नगरीला वेगळाच इतिहास आहे. या महालात आजही शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ठेवी असल्याची जाणीव प्रत्येक डिचोलीकराला आहे. या नगरीत 1993 साली शिवप्रेमी शिवसैनिकांनी जुन्या बसस्थानकावर उभारलेला पुतळा व त्यानंतर काढलेली मवाल मिरवणूक आजही अंगावर शहारे आणते. या नगरीत ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळय़ांसोबत युद्ध आक्रमणाचा सराव केला, आपल्या मावळय़ांना विविध शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले, त्या डिचोली महालात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसणे, हि बाब प्रत्येक शिवप्रेमीला सलत होती. मात्र या स्वप्नाला आज डिचोलीत उभारी मिळत असून सर्व शिवप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे.

15 फुटी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची तयारी जोमात.

   डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींच्या गठीत करण्यात आलेल्या एका समितीने घेतलेल्या पुढाकाराला मोठा पाठिंबा लाभत आहे. आजपर्यंत “शांतादुर्गा हायस्कुलसमोरील सर्कल” म्हणून उल्लेख होणाऱया सर्कलला नवीन ओळख निर्माण होणार आहे. शिवाजी महाराजांचा 15 फुटी पुतळा या सर्कलमध्ये उभा राहणार असून त्याचे काम पुणे येथे करण्यात आले आहे. आज मंगळ. दि. 19 रोजी शिवजयंतीदिनी या पुतळय़ाची स्थापन या सर्कलच्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी सकाळी 9.30 वा. खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related posts: