|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चन्नम्मानगर येथे डॉक्टरच्या बंगल्यात 24 लाखांची चोरी

चन्नम्मानगर येथे डॉक्टरच्या बंगल्यात 24 लाखांची चोरी 

प्रतिनिधी /बेळगाव :

राणी चन्नम्मानगर (पहिले स्टेज) येथील एका डॉक्टर दांपत्याच्या बंगल्यात मोठी चोरी झाली आहे. बेडरुमच्या खिडकीचे ग्रील कापून चोरटय़ांनी सुमारे 24 लाख रुपये किमतीचे 700 गॅमहून अधिक सोने व हिऱयाचे दागिने पळविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

डॉक्टर दांपत्य बेंगळूरला गेलेले असताना चोरटय़ांनी डाव साधला आहे. सोमवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास हे दांपत्य आपल्या बंगल्यावर परतले त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी चंद्राप्पा, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील आदी वरि÷ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

डॉ. राजशेखर चन्नगौडा पाटील यांच्या बंगल्यावर चोरीची ही घटना घडली. राजशेखर यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत. हे दांपत्य आपल्या बंगल्याला कुलूप लावून शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजता बेंगळूरला गेले होते. बेंगळूर येथील काम आटोपून सोमवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास ते बेळगावला परतले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

चोरटय़ांनी बेडरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवण्यात आलेले 50 ग्रॅमचा पोहेहार, 40 ग्रॅमचा टिक्का, 150 ग्रॅमचा श्रृंगार हार, 1 रुबी हार, 35 ग्रॅमचा नेक्लेस, 50 ग्रॅमचे मंगळसूत्र, हिऱयाचे लॉकेट असलेले 10 ग्रॅमचे मंगळसूत्र, हिऱयाचे लॉकेट असलेले 20 ग्रॅमचे मंगळसूत्र, 60 ग्रॅमच्या पाटल्या, 60 ग्रॅमच्या चार बिल्वर, 70 ग्रॅमचे तोडे, 1 जोड रुबी बांगडय़ा, 1 जोड रुबी कर्णफुले, 20 ग्रॅमच्या दोन झुमक्मया, कानात घालण्यासाठी वापरण्यात येणारी 15 ग्रॅमची चेन, कानातील सुमारे 1 लाख रुपये किमतीचे हिऱयाचे टॉप, मोत्याची कर्णफुले, 5 ग्रॅमचे पिकॉक लॉकेट, 15 ग्रॅमच्या तीन अंगठय़ा व एक मनगटी घडय़ाळ असा एकूण 24 लाख 5 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे.

चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. अशाच प्रकारची एक घटना टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही घडली होती. त्यामुळे या दोन्ही चोऱयांमागे एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. यामागे स्थानिक गुन्हेगारांचा हात आहे की आंतरराज्य गुन्हेगारांचा याचा तपास करण्यात येत आहे.

गुन्हेगारांच्या ठश्यांचे नमुने मिळवून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नार्वेकर गल्ली, शहापूर येथील डॉ. अमित मोहन पोतदार यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. चोरटय़ांनी 3 लाखाचे दागिने लांबविले होते. ही घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी आणखी एका डॉक्टर दांपत्याच्या बंगल्यावर मोठी चोरी झाली आहे.