|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोलीत अश्वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे चैतन्यमूर्तीच. प्रा. अनिल सामंत

डिचोलीत अश्वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे चैतन्यमूर्तीच. प्रा. अनिल सामंत 

डिचोली/प्रतिनिधी :

   डिचोलीत सुमारे 15 दिवस मुक्काम केलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या पदस्पर्शाने पावन केलेल्या या भुमीत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणे म्हणजे ती एक चैतन्यमचर्तीच आहे. पराक्रम, नेतृत्व, धाडस, प्रशासन व चारित्र्यवान अशा सर्व गुणांनी निपूण असलेल्या या महाराजांकडे बघताना छाती अभिमानाने भरून येत असते. आजपासून प्रत्येक डिचोलीतील शिवप्रेमींना हा अनुभव येणार आहे. 352 वर्षे व 18 दिवसांनंतर डिचोलीत उभारण्यात आलेल्या या शिवरायांच्या पुतळय़ाच्या दिवसापासून महाराजांचा डिचोलीशी संलग्नित असलेल्या इतिहासाचे ऐक पान लिहीले जावे. असे प्रतिपादन विचारवंत प्रा. अनिल सामंत यांनी डिचोली येथे केले.

  डिचोली येथील शांतादुर्गा हायस्कूलसमोरील सर्कलमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष सतीश गावकर, उपनगराध्यक्ष गुरूदत्त पळ, नगरसेविका चैतन्या तेली, जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़? आदींची उपस्थिती होती.

  शिवाजी महाराजांचा गोमंतकाशी संबंधीत असा मोठा इतिहास आहे, 19 नोव्हे. 1668  या साली शिवाजी महाराज बार्देशमधील कोल्आळ येथे आले होते. त्यावेळी पोर्तुगीज आरमारीने हिंदू लोकांना धर्मांतरण करून ख्रिश्चन होण्याचा फतवा काढला होता. नपेक्षा गाव सोडून जाण्याचा आदेश होता. त्यावेळी हि बाब कानावर पडताच या भागात आलेल्या शिवाजी महाराजांनी त्याकाळच्या पाद्री?ना यमसदनी धाडून सदर फतवा मागे घेण्यास भाग पाडले.त्यानंतर त्यांनी कोलवाळचा किल्ला जिंकून ते डिचोलीला आले. येथे आपल्या पंधरा दिवसांच्या मुक्कामात त्यांनी अनेक पराक्रम केले. याचदरम्यान पोर्तुगीजांशी त्याचा तह झाला की यापुढे धर्मांतरण करू द्यायचे नाही म्हणून व पोर्तुगीजांनी चालविलेला धर्मांतरणाचा छळ त्याकाळापासेन थांबला.

Related posts: