|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बीएसएनएल कर्मचाऱयांची पाटो येथे निदर्शने

बीएसएनएल कर्मचाऱयांची पाटो येथे निदर्शने 

प्रतिनिधी /पणजी :

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) कामकारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून त्याचाच एक भाग म्हणून पणजी-पाटो येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ त्यांनी धरणे केले.

बीएसएनएलच्या कामगारांचा तीन दिवशीय देशपातळीवर संप चालू असून बीएसएनएल संपवण्याचे कारस्थान केंद्र सरकार करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांना केंद्र सरकार पाठिंबा देत असून बीएसएनएलचा सरकारी कंपनीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. कामगारांच्या विविध मागण्याही प्रलंबित असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठीच हा संप चालू असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: