|Monday, August 26, 2019
You are here: Home » विविधा » केरळात देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत

केरळात देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत 

ऑनलाईन टीम / तिरूअनंतपुरम :

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ’केपी-बॉट’चे उद्घाटन केले. केपी-बॉट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून डय़ुटी करणार आहे. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधरणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.

पोलीस कर्मचाऱयाचे मानवी रुप असलेला हा रोबो एका पोलीस कर्मचाऱयांच्या जागी काम करणार आहे. तो मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागतही करेल आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल. या रोबोचा वापर फर्स्ट कॉन्टॅक्ट पॉइंटच्या धर्तीवर करण्यात येईल. पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधरण्याच्या दृष्टीने केपी-बॉटची मदत घेतली जाणार आहे. तसेच पोलिसांची कामगिरी उत्तम व्हावी यासाठीही त्याचा मोठा उपयोग होणार आहे.