|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » वीवो भारतात 4 हजार कोटी रुपये गुंतवणार

वीवो भारतात 4 हजार कोटी रुपये गुंतवणार 

नवी दिल्ली :

चीनमधील मोबाईल निर्मितीत कार्यरत असणारी वीवो कंपनी आगामी काळात भारतीय बाजारात चार हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे.  या गुंतवणुकीच्या आधारे भविष्यातील कंपनीच्या व्यवसायात वृद्धी करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे वीवो इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी माध्यमाशी माहिती देताना सांगितले. भारतातील स्मार्टफोन बाजारात विविध प्रकारच्या मॉडेलची लवकरच निर्मिती करणार असून त्याच्या आधारेच पुन्हा जोरदार नव्याने आपल्या कामातून झेप घेण्यात कंपनी यश संपादन करण्याच्या प्रवासाला वेगळी वाट निर्माण होण्याचा अंदाज ही या दरम्यान कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती भारतीय बाजारात स्मार्टफोन वी-15 प्रोच्या सादरीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्या यांच्याकडून देण्यात आली.

सध्याचा कारभार

कंपनीचा सध्या ग्रेटर नोएडामध्ये मोबाईल कारखाना आहे. या कारखान्यातून वर्षाकाठी 2.5 कोटी मोबाईल निर्मिती करण्यात येते. तर सध्याच्या जागेचा विचार करता लवकरच अजून 169 एकर जमिनीत या प्रकल्पाचा विस्तार करण्याची योजना कंपनी उभारत आहे.

उत्पादन निर्मिती

पहिल्या सत्रात या प्रकल्पामधून 5 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. यातूनच नवनवीन फिचर्स असणारी उत्पादनाची निर्मिती केली जाते. त्यामध्ये वीवोचा 32 मेगाफ्किसल पॉप सेल्फी कॅमेऱयासह लेसची सुविधा आहे व कृत्रिम यंत्रणाही यात जोडली आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असणारा फोन तयार करण्यात आला असून त्याची किंमत 28 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.