|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » परुळे येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या

परुळे येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या 

वार्ताहर / परुळे:

परुळेöबाजारवाडी येथील मिलिंद मनोहर पिळणकर (39) याने राहत्या घराच्या खोलीत गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळपासून मिलिंद हा खोलीचा दरवाजा लावून आत होता. आज (बुधवार) सकाळपर्यंत त्याने दरवाजा न उघडल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या साहय़ाने खोलीच्या वरच्या भागावरून पाहिले असता, मिलिंद यांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीला लटकताना दिसला. यानंतर तात्काळ निवती पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांच्या अंदाजानुसार सोमवारी रात्रीच्यावेळी हा गळफास लावला असण्याची शक्मयता वर्तविण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली  मुल्ला, नाईक व पांचाळ करीत आहेत. घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मिलिंद यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.

Related posts: