|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडीत दुचाकींच्या धडकेत एक गंभीर

वैभववाडीत दुचाकींच्या धडकेत एक गंभीर 

वार्ताहर / वैभववाडी:

उंबर्डे-वैभववाडी रस्त्यावर फौजदारवाडीनजीक मंगळवारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. यातील विजय महादेव कदम (52, रा. सोनाळी गावठणवाडी) हे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस स्थानकात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जयेंद्र अनंत रामाणे हे आपल्या एका मित्रासमवेत वैभववाडीहून उंबर्डे कातकरवाडी येथे दुचाकीने जात होते. तर विजय कदम हे दुचाकीने वैभववाडीकडे येत होते. फौजदारवाडी येथे या दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही दुचाकीवरील एकूण तिघेजण जखमी झाले. कदम यांच्या चेहऱयाला गंभीर दुखापत झाली असून मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातादरम्यान तेथून जाणाऱया रिक्षाचालकांनी जखमींना तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, कदम हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related posts: