|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » स्विस बँक यूबीएसवर न्यायालयाची 36 हजार कोटीची दंड आकारणी

स्विस बँक यूबीएसवर न्यायालयाची 36 हजार कोटीची दंड आकारणी 

वृत्तर्सस्था /पॅरिस :

फ्रान्समधील एका न्यायालयाने स्विर्त्झलॅन्डमधील सर्वात मोठय़ा यूबीएस बँकेवर 36 हजार 210 कोटी रुपयाचा दंड आकारला आहे. बँकेवर दंड म्हणून आकारण्यात आलेली रक्कम ही बँकेच्या 2018मधील एकूण उत्पन्ना इतकी असल्याची नेंद करण्यात आली आहे. परंतु यावर बँकेने हे नियमबाहय़ असल्याने आम्ही सदर निर्णयांच्या विरोधात वरच्या कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी म्हटले आहे.

बँकेचे शेअर्स कोसळले

बँकेला इतका मोठा दंड भरावा लागणार असल्याचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आल्यावर बँकचे शेअर्स 4.2 टक्क्यांनी कोसळल्याचे पहावयास मिळाले आहे.

कर चोरीचा आरोपाच्या निर्णयानूसार मनीलॉन्ड्रिग आणि काळय़ा पैशाची जमवाजमव करण्याच्या प्रवृत्तीला चालना देणे व फ्रान्समधील श्रीमंत लोकांना कर चोरी करण्यासाठी मदत करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने ही दंड आकारणी करण्याचे आदेश दिले आहे.

अहवालात स्पष्टीकरण

यूबीएसवर  आकारण्यात आलेली दंडाची रक्कम ही कायद्याच्या चौकटीत येत नसून हे आरोप खरे ठरविण्यासाठी जे पुरावे सादर करण्यात आले होते ते सक्षम नसून या आरोपातून बचाव करण्यासाठी बँकेकडे अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध असून यातून आम्ही सही सलामत बाहेर पडणार असल्याचा विश्वास बँकेकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.