|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » पाण्याअभावी विद्यार्थीनीचा मृत्यू

पाण्याअभावी विद्यार्थीनीचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

पांढरकवडा येथे गेल्या शनिवारी झालेल्या पंतप्रधन नरेंद्र मोंदी यांच्या सभेत चार-पाच तास पाणी न मिळाल्याने एका विद्यार्थिनीचा उपचारदरम्यान अखेर मृत्यू झाला. क्षितिजा बाबुराव गुटेवार (वय 12, रा. शिवाजी वार्ड, पांढरकवडा), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

शनिवारी पांढरकवडा येथे महिला बचतगटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधन नरेंद्र मोदी येणार असल्याने पांढरकवडा येथील अनेक महिलांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. क्षितिजाही तिच्या आई व भावासह ऑटोरिक्षाने या मेळाव्याला आली होती. आपली गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्याही नेल्या होत्या. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कोणालाही पाण्याची बॉटल सभा स्थळी नेऊ दिली नाही. हजारो महिला सकाळी आठ वाजतापासूनच सभा स्थळी आल्या होत्या. मेळावा स्थळी पाण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. पाणी पाऊच नेण्यासही पोलिसांनी मनाई केली होती. 11 वाजताची सभा असल्याने ऊनही जोरात होते. त्यामुळे उपस्थित महिला तहानेने व्याकुळ झाल्या होत्या. त्यामुळे अनेक महिला सभेच्या ठिकाणावरून उठून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना महिला पोलिसांनी त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. पाण्याची सोय नसल्याने तहानलेल्या क्षितिजालाही पिण्यासाठी पाणी मिळाले नाही.