|Monday, September 16, 2019
You are here: Home » leadingnews » भारतच दहशतवाद पसरवत आहे ; पाकच्या उलटय़ा बोंबा

भारतच दहशतवाद पसरवत आहे ; पाकच्या उलटय़ा बोंबा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतच दहशतवाद पसरवत आहे असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. आम्ही स्वतः दहशतवादाविरुद्ध लढत असून कसलाही विचार न करता भारताकडून पाकिस्तानवर आरोप लावले जात असल्याचे पाकिस्तानी लष्कराने आज घेतलेल्या एका पत्रकार परिषद म्हटले आहे.

  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर युद्धाच्या चर्चांना सुरुवात झाली असतानाच पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचे पाकिस्ताने सांगितले आहे. कुलभूषण जाधव हा भारतीय दहशतवादाचा चेहरा असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. 1947 पासून काश्मीरींवर भारत अत्याचार करत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले असून उलट भारतानेच बांगलादेश निर्मितीच्या वेळेस दहशतवाद केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.