|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बोलण्यात गुंतवून पळवली 28 लाखांची रोकड

बोलण्यात गुंतवून पळवली 28 लाखांची रोकड 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील सेव्हन लव्हज चौकातील स्टेट बँकेच्या शाखेत चोरी झाल्याने खळबळ उडाली. या शाखेतून चोरटय़ांच्या टोळीने तब्बल 28 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. सुमारे सात ते आठ जण स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. कॅशियर आणि अन्य व्यक्तिंना बोलण्यात गुंतवून ठेवत कॅशियरच्या मागे पैशांनी भरलेली पेटीच लंपास केली. अन्य व्यक्तिंना पैसे देण्यासाठी कॅशियर मागे वळल्यानंतर रोकड असलेली पेटी लंपास केल्याचे लक्षात आले. या पेटीमध्ये तब्बल 28 लाख रुपये असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली.

 

चोरी करणारी ही टोळी शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. आरोपींनी पेटीतील पैसे काढून घेऊन ती पेटी टिळक रस्त्यावर टाकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.