|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आयपीएल2019 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा 23 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे बाराव्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवडय़ांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा कायम गाजावाजा करत पार पडतो. पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळय़ासाठी होणार खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली.

 

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले की आयपीएलच्या उदघाटन सोहळय़ामध्ये जेवढा खर्च होतो, तो निधी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धेचा उदघाटन सोहळा होणार नाही.यंदाच्या वषी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झाले. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी शनिवारी (24) होणार आहे.