|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » बांगलादेशी तरूणाने क्षुल्लक कारणावरून महिलांवर केला जीवघेणा हल्ला

बांगलादेशी तरूणाने क्षुल्लक कारणावरून महिलांवर केला जीवघेणा हल्ला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादर परिसरात कुरियर घेऊन गेलेल्या बांगलादेशी तरुणाने महिलेवर पेनाने हल्ला केला आहे. दादर परिसरात राहणाऱया दोन महिलांना कुरियर घेऊन आलेल्या बांगलादेशी तरुणाला मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्याला विरोध करत क्षुल्लक कारणावरून त्या कुरियर बॉयने पेनाने महिलांच्या गालावर हल्ला केला. यामुळे महिला किरकोळ जखमी झाल्या असून शिवाजी पार्क पोलिसांनी या हल्लेखोर बांगलादेशी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी का बोलत नाही? असे विचारल्यावर एका परप्रांतिय तरुणाने शिवाजी पार्क येथे महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दादरमध्ये घडली. या हल्यात विनीता पेडणेकर (51) ही महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात इब्राहिम शेख (27) तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यवार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अजिनाथ सातपुते यांनी सांगितले. दादरच्या सेनाभवनजवळील एन.सी.केळकर मार्गावरील गुरू कृपा इमारतीत विनीता पेडणेकर या त्याच्या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी त्यांनी फोरम कुरिअरद्वारे काही पुस्तके मागवली होती. ही पुस्तके घेऊन आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी इब्राहिम शेख विनीता यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याला हिंदी ही व्यवस्थित बोलता येत नव्हते. त्यावेळी विनीता यांनी त्याला महाराष्ट्रात काम करताना मराठी बोलणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावरून इब्राहिमने विनिता यांना उर्मटपणे उत्तरे देऊ लागला. त्यावेळी विनीता यांची धाकटी बहिण सुजीता पेडणेकर या मध्ये पडल्या असता. इब्राहिमने त्यांच्या डोक्मयात बुक्की मारली. ऐवढ्यावरच न थांबता इब्राहिमने अचानक हातातील पेन विनिता यांच्या गालावर ओढला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीसाठी धावले. स्थानिकांनी वेळीच ही गोष्ट मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कानावर घातल्यानंतर संदीप देशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवाजी पार्क पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी इब्राहिमला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरू आहे. पोलिस चौकशीत इब्राहिम हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी असून तो सध्या माटुंगा पूर्व परिसरात राहतो. महिन्याभरापूर्वी तो मुंबईत आला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी येऊन देखील त्याच्याजवळ मुंबईतील आधारकार्ड आढळून आले. त्यामुळे इब्राहिम हा नक्की पश्चिम बंगालमधून आला आहे की बांगलादेशमधून याची पोलीस शहानिशा करत आहेत. त्याने बनवलेले आधारकार्ड ही खरे आही की खोटे याची पोलीस पडताळणी करणार आहेत.

Related posts: