|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘कोमसाप’चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

‘कोमसाप’चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर 

डॉ. अनंत देशमुख ‘कोकण साहित्य भूषण’, डॉ. महेश केळुसकर ‘कविता राजधानी’ यासह अनेकांना पुरस्कार जाहीर

वार्ताहर / कणकवली:

कोकण मराठी साहित्य परिषदेचे 2018-19 चे वाङ्मयीन व वाङ्मयेत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्ये÷ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ‘कोकण साहित्यभूषण,’ तर डॉ. महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. रोख 10 हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हय़ातील कुडाळ-झाराप येथील डॉ. प्रसाद देवधर, मालवण कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकुर यांना वाङ्मयेत्तर पुरस्कार, तर मूळ खारेपाटण येथील डॉ. अनुजा जोशी यांना त्यांच्या काव्यसंग्रहासाठी आरती प्रभू स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह इतर अनेक वाङ्मयीन व वाङ्मयेत्तर पुरस्कारांची घोषणा पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकुर यांनी जाहीर केली.

कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकिर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, दृकश्राव्य- कला-सिनेमा या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

2018-19 चे वाङ्मयीन पुरस्कार पुढीलप्रमाणे : कादंबरीचा वि. वा. हडप स्मृती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सौ. तनुजा उल्हास ढेरे (गोष्ट एका वळणावरची), कथासंग्रहाचा वि. सी. गुर्जर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार भा. ल. महाबळ (ओळख), तर विद्याधर भागवत स्मृती द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार अरविंद हेब्बार (दरवळ), कविता वाङ्मय प्रकाराचा आरती प्रभूस्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. अनुजा जोशी (उन्हाचे घुमट खांद्यावर), तर वसंत सावंत स्मृती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रशांत डिंगणकर (दगड), चरित्र-आत्मचरित्रासाठी धनंजय किर स्मृती प्रथम क्रमाकांचा पुरस्कार शिल्पा सुर्वे (हिराबाई पेडणेकर) यांना जाहीर करण्यात आला आहे.

श्रीकांत शेटय़े स्मृती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार उमाकांत वाघ (वळख), समीक्षा ग्रंथासाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. अंजली मस्करेन्हस (आदिवासी लोककथा मिमांसा), ललित गद्यासाठी अनंत काणेकर स्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विनया जंगले (मुक्मया वेदना बोलक्मया संवेदना). ललित गद्यासाठी सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती द्वितीय पुरस्कार आर. एम. पाटील (आठवणीतील पानगळ साठवणीतील गुलमोहर), बाल वाङ्मयासाठीचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार सौ. रेखा आदित्य जेगरकल (स्वाती, अक्षय आणि तुम्ही सारे). संकिर्ण वाङ्मयासाठीचा वि. कृ. नेरुरकर स्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. किरण सावे (चार्वाक दर्शन प्रासंगिकता). अरुण आठल्ये स्मृती द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार वैभव दळवी (समुद्रायन). नाटक-एकांकिकांसाठीचा रमेश किर पुरस्कार शांतीलाल ननावरे (ही वाट दूर जाते). तसेच कोमसापचा विशेष पुरस्कार विकास वऱहाडकर (बॅनरांजली) यांना जाहीर झाले आहेत. प्रथम क्रमांकांना रोख 5 हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमांकाला 3 हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

वाङ्मयेत्तर पुरस्कार पुढीलप्रमाणे : गुरुवारी अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सुरेश ठाकुर (आचरे-मालवण), राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार सौ. आरती कुलकर्णी (ठाणे), वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार कोमसाप डहाणू शाखा, संमेलन सारथी पुरस्कार प्रा. दीपा ठाणेकर (ठाणे), सौ. नमिता किर लक्षवेधी पुरस्कार सौ. विना माच्छी (डहाणू), सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार परिणिता घरत (पालघर), कै. भाऊसाहेब वर्तक प्रति÷ान पुरस्कार हरेश्वर दामोदर सावे (कुरगाव-तारापूर), श्री. बा. कारखानीस पुरस्कार प्रसाद देवधर (झाराप ता. कुडाळ). कवी उमाकांत किर स्मृती काव्य पुरस्कार शिल्पा नाईक (दापोली), कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार सुरेखा कुरकुरे (विरार) यांना जाहीर करण्यात आले आहेत.