|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » नरेंद्र मोदी हे प्राईम टाईम मिनिस्टर : राहुल गांधी

नरेंद्र मोदी हे प्राईम टाईम मिनिस्टर : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली  :

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धोंजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ’प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1098829908355268608

 

राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून मोदींवर टीका केली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती मिळल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर शूटिंगमध्ये व्यस्त होते असे हिंदीमध्ये ट्वीट केले आहे. ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच  #PhotoShootSarka हा हॅशटॅग वापरला आहे.