|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » 100 रूपयात उत्तर अन् उत्तरे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रूपये

100 रूपयात उत्तर अन् उत्तरे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रूपये 

ऑनलाईन टीम / नांदेड :

बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेर शंभर रुपयात उत्तराची विक्री सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कंधार तालुक्मयातील पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनि÷ महाविद्यालय पानभोसी इथल्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार आहे. 100 रुपयांना एका उत्तराची विक्री सुरु होती. तर परीक्षार्थीपर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये आकारले जात होते. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांसमोर परीक्षा केंद्रांवर हा प्रकार सुरु होता.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनि÷ महाविद्यालयात शुक्रवारी (22 फेब्रुवारी) हिंदी विषयाची परीक्षा होती. परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच प्रश्न बाहेर आले. काही तरुण एका प्रश्नाच्या उत्तराची 100 रुपयांना विक्री करत होते. तर उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रुपये लागतील, असे सांगत होते. शेजारीच असलेल्या बारुळ इथल्या श्री. शिवाजी विद्यालयातही असाच प्रकार सुरु होता. नांदेड जिह्यात 81 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. 261 कनि÷ महाविद्यालयातील 37 हजार 782 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मोबाईलवर निर्बंध असतानाही काही जण सर्रास वापर करत करत होते. परीक्षा केंद्रबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुण होते. काही जण केंद्राच्या खिडकीत जाऊन आत उत्तराच्या चिठ्ठय़ा टाकत होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणार असून शनिवारी संबंधित परीक्षा केंद्रावर भरारी पथक पाठवण्यात येईल, असे गटशिक्षणाधिकाऱयांनी सांगितले.