|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करताच पळ काढतात – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करताच पळ काढतात – राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शनिवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तरुणांसोबत संवाद साधला. माझा राहुलजी ऐवजी राहुल असाचा उल्लेख करा असा सल्ला राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. या कार्यक्रमात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करता पळ काढतात असे राहुल यांनी म्हटले असून मोदींना समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.

राहुल गांधी यांनी मोदी सरकार श्रीमंताचे कर्ज सरकार माफ करते, पण शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही मार्ग नसतो असे म्हटले आहे. मोदी सरकारमध्ये शिक्षणाच्या बजेटमध्ये कपात झाली, सरकारने 15 ते 20 उद्योजकांना तीन लाख कोटी दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे.