|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते – चंद्रकांत खैरे

भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते – चंद्रकांत खैरे 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे.

रुग्णांच्या नाडीवर हात ठेऊन जप केला तर रुग्ण बरा होतो. प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते, असा खळबळजनक आणि हास्यास्पद दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी हा दावा कोणत्या निवडणुकीच्या प्रचार सभेत केला नाही. तर चक्क राज्य सरकारच्या आरोग्य मेळाव्यात केला आहे. या मेळाव्यात अनेक डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्यासमोर चंद्रकांत खैरे यांनी असे बेजबाबदार विधान केले आहे.