|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अबब…तब्बल एक किलोचा पेरु

अबब…तब्बल एक किलोचा पेरु 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

बाराही महिने बाजारात पहावयास मिळणार पेरु आता विविध आकारातील पेरु बाजारात आले आहेत. वैशिष्ट म्हणजे या पेरुंची गुलाबी, पाढरा, लाल असे अंतरंग असलेले पेरु मिळत आहेत. त्यातही वेगवेळय़ा सुधारीत जाती तयार झाल्या आहेत. शनिवारी शिवाजी रोड वरील एका व्यापाऱयाकडे तब्बल एक किलोग्रॅम वजनाचे पेरु विक्रीसाठी आले आहेत. पेरु उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथून हे पेरु आले आहेत. 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री सुरु आहे. पेरुची गोडी आणि गरामध्ये बियांचे प्रमानही कमी असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने विक्रेता आक्रम यांनी सांगितले.