|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर

शिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर 

प्रतिनिधी / मालवण:

  सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 1 कोटी 52 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 18 फेब्रवारी 2019 रोजी याबाबतचा शासन निर्णय शासनाने निगर्मित केला आहे. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

   शिवराजेश्वर मंदिर ऐतिहासिक व प्राचीन असून या ठिकाणी भेट देण्यासाठी दरवषी लाखो पर्यटक येतात. या मंदिराची डागडुजी, बांधकाम व नूतनीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी आपण शासनाकडे सातत्याने केली होती. परंतु केंद्रीय पुरातत्व खात्याची परवानगी मिळत नसल्याने कामाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी येत होत्या. पावसाळय़ापूर्वी मंदिराची दुरुस्ती होण्याचीही मागणी सातत्याने होत होती.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शिवराजेश्वर मंदिर दुरुस्ती व नूतनीकरणाची आपण मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय पुरातत्व खात्याने या कामाला मान्यता दिली असून यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 1 कोटी 52 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली हे काम होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मंदिराच्या डागडुजीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले होते. याबाबत गेल्या चार वर्षांत पुरातत्व खात्यांतर्गत अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

Related posts: