|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » साखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान

साखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान 

अबुजा :

नायजेरियात साखळी बॉम्बस्फोटांमुळे कडेकोट सुरक्षेदरम्यान अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बॉम्बस्फोटांमुळे मतदान विलंबाने सुरु झाले. अध्यक्षांसोबतच प्रतिनिधीगृहाचे 360 सदस्य तसेच 109 सिनेटर्ससाठी मतदान पार पडणार आहे. एकूण 6500 उमेदवार उभे राहिले असून देशभरात 12 हजार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

निवडणुकीचा निकाल पुढील आठवडय़ात लागण्याची अपेक्षा स्वतंत्र राष्ट्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. आयोगाने मागील शनिवारी निवडणूक एक आठवडय़ासाठी पुढे ढकलली होती. पूर्व मैदुगुरीमध्ये साखळी स्फोटांमुळे मतदानाची प्रक्रिया प्रभावित झाली. तर नायजेरियाच्या योबे राज्यात बोको हरामचे दहशतवादी आणि सैन्यादरम्यान संघर्ष सुरू आहे. योबे राज्यातील गीदम शहरात झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांना पलायन करणे भाग पडले. मैदुगुरीमध्ये बोको हरामने वारंवार हल्ले केले आहेत.