|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला

आरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला 

नोएडा :

यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणात जमीन खरेदी प्रक्रियेत झालेल्या 126.42 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा तपास सीबीआय करत आहे. घोटाळय़ातील आरोपींना वाचविण्याच्या बदल्यात 22 लाख रुपयांची लाच घेण्याचा आरोप असणारे सीबीआयचे फरार निरीक्षक सुनील दत्त यांच्या अटकेसाठी सीबीआयचे पथक शनिवारी सकाळी ग्रेटर नोएडा येथील त्यांच्या सुनपुरा गावी येथे गेले होते.

सीबीआय पथकाने छापा टाकताच गावकऱयांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच सीबीआय पथकाला मारहाण करत सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पथकाचे नेतृत्व करणारे निरीक्षक जी.एस. मीणा यांनी किमान 12 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत तपासास प्रारंभ केला आहे.