|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जवानांच्या हौतात्म्यावर केंद्राकडून राजकारण : ममता

जवानांच्या हौतात्म्यावर केंद्राकडून राजकारण : ममता 

कोलकाता :

पुलवामा हल्ल्याबद्दल गुप्तचरांकडून पूर्वसूचना मिळून देखील मोदी सरकारने पाऊल उचलली नसल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली आहे. जवानांच्या हौतात्म्यावर केंद्र सरकार राजकारण करू पाहत आहे. आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारला माहित होते, तरीही आमच्या जवानांना वाचविण्यासाठी सरकारने पाऊल का उचलले नाही? निवडणुकांमध्ये जवानांच्या हौतात्म्यावर राजकारण करता यावे याकरता सरकारने त्यांना मरू दिल्याचा गंभीर आरोप ममता यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी युद्धावरून उन्मादाचे वातावरण निर्माण केले जातेय. केंद्र सरकार विचित्र पद्धतीने काम करत आहे. केंद्रीय मंत्र्यांना देखील महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल कल्पना नसते. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे ममतांनी म्हटले आहे.

Related posts: