|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘चांगभल’च्या गजरात कणगले यात्रेची सांगता

‘चांगभल’च्या गजरात कणगले यात्रेची सांगता 

वार्ताहर /  कणगले :

कणगले (ता. हुक्केरी) येथील त्रैवार्षिक महालक्ष्मी देवीच्या यात्रेची ‘महालक्ष्मीच्या नावानं चांगभल’च्या गजरात सांगता झाली. यात्राकाळात 6 लाख भाविकांनी दर्शन घेतले तर 60 लाखाची उलाढाल झाली आहे.

शुक्रवार दि. 22 ते सोमवार 25 पर्यंत भरलेल्या या त्रैवार्षिक महालक्ष्मी यात्रेत सोमवारी सकाळी देवीस नवसाचे रेडे सोडण्यात आले. व पुरणपोळीचा नैवद्य दाखविला. दुपारी 3 वाजता यात्रा कमिटी कार्यालयापासून डफ पिपाणीने पंच, मानकरी, गावकरी, हक्कदार देवरे यांची मानाची भंडार पिशवी व काठी मिरवणुकीत सामील झाली. पंच कल्याणी यांची आरती आणण्यात आली. यानंतर सर्वजन महालक्ष्मी मंदिरात हजर झाले. तेथे मानकरी रानमरे यांची माहेरची साडी लक्ष्मीस नेसवली, इंगळोबास अंगरखा टोपडे घातले. मानकरी, हक्कदार, पंच यांनी उत्सवमूर्ती खेळवून युवकाकडे सुपूर्द केली. फलटणे, कमते गल्ली, पाटील गल्लीत ओटी भरुन घेत मिरवणूक बाहेर पडली. तेथून पुन्हा महालक्ष्मी मंदिराकडे परत आली. तेथे मंटपा बाहेरील कुडाचा मांडव पेटविला. त्या मांडवावरुन उत्सवमूर्ती मिरवणूक नेण्यात आली.

आत्पगिरे गल्ली, लक्ष्मी रस्ता, शहा कॉर्नर मार्गे पेठलाईनमधून सोनार वाडय़ासमोर खण नारळाची ओटी भरुन घेत वेशीत आली. तेथे चन्नीकुपी यांनी उत्सवमूर्तीवरुन 5 कोंबडय़ाची पिल्ली ओवाळून टाकली. तेथून थळेश्वर प्रवेशद्धारासमोर विश्रांतीस थांबली. तेथे हक्कदार भोजनेची दुरडी आणण्यात आली तेथून पुन्हा मिरवणुकीस प्रारंभ झाला. अप्पणगौडा पाटील विद्यामंदिर, प्राथमिक शाळामार्गे मिरवणूक कुटकोळी यांच्या शेतातील पादुका कट्टय़ाजवळ थांबल्यावर तेथे महाआरती करण्यात आली. तेथून शिवेच्या मंदिराकडे प्रस्थान झाली. तेथे नैवेद्य दाखवून दुरडी देऊन मिरवणुकीचे विसर्जन करुन गावकरी पहाटे चार वाजता परत आले.

Related posts: