|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मुख्यमंत्र्यांना गोमेकॉतून डिस्चार्ज 

प्रतिनिधी /पणजी :

गोमेकॉतील 4 दिवसांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल मंगळवारी सायंकाळी इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती जैसे थे असून आता घरीच त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

गेले वर्षभर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वादूपिंडाच्या बिघाडामुळे गंभीर आजारी आहेत. 4 दिवसांपूर्वी त्यांचा आजार गंभीर पातळीवर येऊन पोहोचला. फुफ्फुसात पाणी झाले तसेच पोटात रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. पुढील उपचारासाठी त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले, मात्र परिस्थिती गंभीर असल्याने दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून डॉ. प्रसाद गर्ग व त्यांच्या इतर दोन तज्ञ डॉक्टरांना गोव्यात पाचारण करण्यात आले. गोमेकॉमध्ये रविवारपासून त्यांनी त्यांच्यावर उपचार केले व सोमवारी सायंकाळी ते दिल्लीला रवाना झाले. पोटातील रक्तस्राव बंद करण्यात त्यांना यश आले.

पर्रीकरांची प्रकृती स्थीर आहे. त्यानंतर त्यांना मंगळवारी सायंकाळी गोमेकॉतून त्यांच्या दोनापावला येथील खासगी बंगल्यावर पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा झाली असली तरी प्रकृती नाजूक बनलेली आहे. पर्रीकरांच्या प्रकृतीमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावरच सध्याचे गोव्याचे आघाडी सरकार अवलंबून आहे.

Related posts: