|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » अमेरिका भारतासोबत, दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा, पाकिस्तानला झापले

अमेरिका भारतासोबत, दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा, पाकिस्तानला झापले 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली  : 

भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले.  कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा भारताला इशारा दिला आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असून अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले आहे. आता अमेरिकेनेही पाकिस्तानला झापले असून लष्करी कारवाई करायची असेल तर आधी देशातील दहशतवाद्यांवर करा, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने देखील भारताला सोबतीची खात्री दिली आहे.

अमेरिकेने  भारताला समजूत देण्याआधी पाकिस्तानलाच दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि पाकिस्तानने  त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, असेही स्पष्ट केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकाटमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. यानंतर अमेरिकेने या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधील या ऑपरेशनसाठी भारताला अमेरिकेची साथ मिळाली असून अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्याच्या सल्ला दिला आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे गरजेचे असल्याने भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले आहे. सध्या भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली.

Related posts: