|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण अर्धवट सोडून बैठकीसाठी रवाना

चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण अर्धवट सोडून बैठकीसाठी रवाना 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील विज्ञान भवन येथील एक कार्यक्रम अर्धवट सोडून निघाले. भाषण सुरु असताना नरेंद्र मोदी यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली आणि यानंतर मोदी भाषण आवरते घेत तिथून निघून गेले. मोदींनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी हे एका बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 मंगळवारी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केले होते. दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बुधवारी पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. यातील एक विमान भारताने पाडले होते.