|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा , जपानने पाकिस्तानला सुनावले

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा , जपानने पाकिस्तानला सुनावले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचला अशा शब्दांत जपाननेपाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी 14 फेब्रवारीला भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असे म्हटले आहे.

 

जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी ‘काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडत असून आपल्याला चिंता आहे. 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावले उचलणे ‘भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दल यांच्यात 26 फेब्रुवारीपासून तणावपूर्ण स्थिती असून भारत आणि पाकिस्तानने कारवाई थांबत चर्चेतून प्रश्न सोडवणे गरजेचे आहे’ असेही टारो कोनो यांनी सांगितले.

 

Related posts: