|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » युटय़ूबवरून चित्रफिती हटविल्या जाव्यात!

युटय़ूबवरून चित्रफिती हटविल्या जाव्यात! 

पाकचे एफ-16 विमान पाडल्यानंतर भारताचे मिग विमान एलओसी ओलांडून पीओकेत पोहोचले होते. मिग विमान पाडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते. पाक सैन्याने अभिनंदन यांना दर्शविणारी एक चित्रफित प्रसारित केली होती, यात अभिनंदन पाक सैन्याधिकाऱयांच्या प्रश्नांना धैर्यांना सामना करताना दिसून आले होते.

ही चित्रफित समोर येताच लोकांनी ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रारंभ केला होता. तसेच काही जणांनी चित्रफित युटय़ूबवर अपलोड केली होती. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने युटय़ूबला याप्रकरणी निर्देश देत चित्रफित हटविण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने याबद्दल माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाशी संपर्क साधला होता.

 

Related posts: