|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नाती जपताना समाजात परिवर्तनाची गरज

नाती जपताना समाजात परिवर्तनाची गरज 

प्रतिनिधी/   संकेश्वर

काळाच्या ओघात बदल होत असताना जग जवळ येत आहे. पण नाती बिघडत चालली आहे. याचा विचार करण्यासाठी चांगल्या परिवर्तनाची समाजात गरज आहे. असे प्रतिपादन आनंदा शिंदे यांनी व्यक्त केले. ते रसिक मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेत शेवटचे अर्थात पाचवे पुष्प गुंफताना ‘नाती जपताना’ विषयावर बोलत होते.

शिंदे म्हणाले, नाती बळशाली घट होण्यासाठी लाज न वाटून घेता ती स्वीकारण्याचा प्रयत्न करा, यासाठी आपला इगो बाजूला ठेवणे गरजेचे आहे. पप्पा व मम्मी हे शब्द मुखातून बाहेरचे आहेत. मात्र आई, बाबा बेंबीच्या देढातून शब्द येतात ते कायम पण टिकावू असतात. यासाठी आईच आईपण घरात टिकविल्यास घरातील वाती दुरावली जात नाही. असे स्पष्ट करुन म्हणाले, स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी माणसातील माणूस ओळखून त्याला जबाबदारी वाटून दिली होती. म्हणून स्वराज्याचे स्वप्न साकारल गेले. यासाठी स्वताच्यात बदल घडविल्यास समाजात परिवर्तन घडण्यास सुलभ जाईल असे त्यांनी सांगितले.

आजच्या जमान्यात नाती निकृष्ठ झाली आहेत. यासाठी मुलांना थोडी मोकळीक द्यावीत मात्र त्यावर वडील धाऱयांनी नजर ठेवल्यास त्यातून नाती बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच मातृतुल्य भाषा आपण जपली पाहीजे. यामुळे घरपण, माती, भाषा टिकविणे ही आपली जबाबदारी राहील असे त्यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमास डॉ नंदकुमार हावळ, श्रीकांत नाईक, राजेंद्र बोरगावी, शंकरराव हेगडे, अशोक मास्तोळीमठ, बाबुराव मरगुद्दी, डॉ विनोद गायकवाड, श्रीकांत परिट, कुमार नेसरी, बसवराज नागराळी, शंकर सपाटे. श्रीनिवास खटावकर, बाबुराव हलगडगी, सौ हेमा इंडी, नर्मदा मदीहळ्ळी, शिवानी धूडूम, लिलाबाई सुगंधी, सविता सावंत, अरुणा कुलकर्णी उपस्थित होते. स्वागत गिरीश कुलकर्णी, सुत्रसंचालन आप्पा मोरे तर आभार एम. ए. शिंदे यांनी मानले.