|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अभिनेते अतुल कुलकर्णीच्या हस्ते रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया सेंटरचे उद्घाटन

अभिनेते अतुल कुलकर्णीच्या हस्ते रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया सेंटरचे उद्घाटन 

ऑनलाईन टीम / पुणे :

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई मध्ये एका पाठोपाठ 2 रोबोटिक च्या माध्यमातून सांधेरोपण शस्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 65 वर्षाच्या कांचन पाटील या 5 वर्षापासून गुधगेदुखीच्या त्रासाला सामोरे जात होत्या.मात्र गुढघ्यावर झालेल्या नॅव्हीओ पीएफएस रोबोटिक्स सर्जिकल च्या माध्यमातून त्या शस्त्रक्रियेच्या चार तासाच्या आत चालू देखील लागल्या.

रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे. या रोबोटिक असिस्टेड शस्रक्रियेत अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि बदललेल्या कृत्रिम सांध्यात मिळणाऱया नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात. रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे.・असे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख डॉ. तेजस उपासनी म्हणाले. ते पुढे म्हणाले की・मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्मय झाले आहे. हे अतिशय प्रगत असे तंत्रज्ञान आमच्या रुग्णालयात उपलब्ध आहे. ज्यामुळे रुग्णांना माफक दरात अधिक चांगल्या सुविधा मिळ्तील व शस्त्रक्रियेनंतर चा त्रास ही कमी होतो. उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई येथे रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन अतुल कुलकर्णी, अभिनेते यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले, वैदकीय क्षेत्रातील या महत्वाचा बदलाने आयुष्य वाढवले आहे, हे विज्ञानाची सिद्धी आहे वैदकीय शास्त्रात झालेली प्रगती व नव-नव्या सोयी व उपकरणांमुळे मोठ मोठय़ा आजारांवर आळा घालण्यास मदत होते. जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामांमुळे या रुग्णांचे नातेवाईक अत्यंत आनंदी आहेत,

या शस्त्रक्रिये नंतर रुग्ण 2-3 दिवसात घरी जाऊ शकतो. मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्मय झाले आहे, शस्रक्रियेनंतर रुग्ण अधिक समाधानी व आत्मविश्वासपूर्वक चालू शकतात. एक-दोन दिवसातच स्वतः घरी चालत जाऊ शकतात, यामुळे रुग्णालयात राहण्याचा अतिरिक्त खर्च देखील कमी होतो, तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. रुग्ण स्वतःच हिंडू/ फिरू शकल्याने शस्रक्रियेनंतर फिजिओथेरपीची आवश्यकता भासत नाही. एकूणच, रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच ठरले आहे. उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ.तेजस उपासनी व सेठ जी.एस मेडिकल कॉलेज चे माझी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी यांच्या पुढाकाराने रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.

या वेळी सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज चे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी, म्हणाले, रोबोटीक टेक्नोलॉजी च्या साहाय्याने कमी वेळात पेशंटस् ना कृत्रिम भाग बसवणे जास्त फायदेशीर आणि अचूक होत आहे. यामूळे कृत्रिम भाग दीर्घयुष्यी झाले. मुंबई मध्ये रोबोटीक टेक्नोलॉजी कृत्रिम भाग बसवण्याची ही सुविधा उपलब्ध झाल्या व त्याचबरोबर उपासानी सूपर स्पेशालीटी हॉस्पिटल च्या सर्जनच्या योग्य हातात आहे याचा मला आनंद आहे. जेव्हा डॉ. तेजस उपासनी ना विचारले की त्यांनी ही टेक्नोलॉजी का निवडली, ते म्हणाले, आम्ही USSH मध्ये नेहमी पेंशटंस्ना चांगलेच देण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही नेहमी पेशटंच्या सुरक्षतेवर व चांगल्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतो.