|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

सूर्य, नेपच्यून युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला वेग येईल. लोकांना तुमचे विचार पटतील. प्रयत्न वाढवा. पुढाकार मोलाचा ठरेल. धंद्यात लक्ष द्या. हिशोब नीट करा. घरातील वातावरण उत्साहवर्धक राहील. नवीन ओळखीने तुमचे अडलेले काम करून घेता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या, यश मिळेल. कोर्टकेसमध्ये मदत मिळेल. शुक्रवारी सावध रहा.


वृषभ

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. या सप्ताहात कठीण कामे करून घेता येतील. अडचणी कमी होतील. राजकीय- सामाजिक कार्यात योजना पूर्ण करा. लोकांचा विश्वास मिळवा. धंदा वाढवता येईल. घरातील गैरसमज दूर करून खेळीमेळीचे वातावरण तयार होईल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेसाठी जास्त तयारी करा. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल.


मिथुन

सूर्य, नेपच्यून युती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात अशांतता राहील. क्षुल्लक कारणाने नाराजी होईल. अनाठायी खर्च करावा लागेल. धंद्यात लक्ष द्या. फायदा होऊ शकेल. राजकीय- सामाजिक कार्यात मेहनत घ्या. वरि÷ांना खूष करा. लोकांची नाराजी होऊ शकते. कला, क्रीडा क्षेत्रात प्रभाव राहील. मैत्रीत तुटकपणा जाणवेल. शिक्षणात मुलांनी थोडाही आळस करू नये. अपयश टाळता येईल. जिद्द ठेवा. व्यसनात पडू नये.


कर्क

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय, सामाजिक कार्यात तणाव होईल. वरि÷ांच्या बरोबर वाद होईल. गुप्त कारवायांना रोखावे लागेल. योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने वागा. धंद्यात  काम मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धेत टिकून रहा. मुलांनी परीक्षेतील यशासाठी सरळ मार्गे अभ्यास करावा, यश येईल.


सिंह

सूर्य, नेपच्यून युती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. या सप्ताहात तुम्हाला संयमाने बोलावे लागेल. अडचणी येतील. मन अस्थिर होईल. धंद्यात कामगार अडथळे आणू शकतात. प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात दडपणाखाली रहाल. ठोस निर्णय घेणे कठीण वाटेल. घरात जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर वाद होईल. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल.


कन्या

चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. फायदा मिळेल. कुठेही दादागिरीने वागू नका. नाहीतर होणारे काम बिघडेल. राजकीय- सामाजिक कार्यात गुप्त कारवायांच्याकडे दुर्लक्ष करू नका. मंगळवार, बुधवारी अडचण येईल. कामास विलंब होईल. घरातील कामे होतील. मुलांचे सहकार्य मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी वाट पहावी लागेल. परीक्षेसाठी चांगली तयारी करा. वाकडय़ा वाटेने जाऊन यश मिळवू नका.


तुळ

सूर्य, नेपच्यून युती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वरि÷ांच्या मर्जीनुसार तुमचे विचार त्यांचे पुढे ठेवा. धंद्यात किरकोळ अडथळे येतील. सप्ताहाच्या शेवटी  सावध रहा. दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. नातलगांच्या भेटी होतील. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेसाठी जास्त अभ्यास केल्यास मोठे यश मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करा.


वृश्चिक

चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. मित्रांची मदत घेता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीतून मार्ग काढवा लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. परीक्षेसाठी नियमित अभ्यास करा.


धनु

सूर्य, नेपच्यून युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. थकबाकी वसूल करा. प्रत्येक दिवस उत्साहाचा ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात वरि÷, सहकारी मदत करतील. प्रति÷ा मिळेल. गैरसमज दूर होईल. कला, क्रीडा क्षेत्रात पैसा व प्रसिद्धी मिळेल. परीक्षेसाठी मुलांनी जास्त अभ्यास करावा, तरच चांगले यश मिळेल.


मकर

सूर्य, नेपच्यून युती, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. कठीण वाटणारे काम या आठवडय़ात करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकप्रियता मिळेल. दौऱयात यश येईल. राग ठेवू नका. प्रेमाने बोला. मोठे कार्य करा. धंद्यात चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणारे येतील. शेअर्समध्ये फायदा होईल. शेतकरी वर्गात उत्साह वाढेल. माल विकला जाईल. कला, क्रीडा शिक्षणात पुढे जाल.


कुंभ

सूर्य, नेपच्यून युती, सूर्य, शनि लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मैत्रीत तणाव होईल. घरगुती अडचणी येतील. राजकीय- सामाजिक कार्यात प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास अढळ राहील. जवळचे लोक टीका करण्याची शक्मयता आहे. धंद्यात काम मिळेल. व्यवहारात लक्ष द्या. खर्च वाढू शकतो. कला, क्रीडा, शिक्षणात मनाप्रमाणे प्रगती करता येईल. नवीन ओळख नीट पारखून घ्या. जास्त विश्वास टाकू नका.


मीन

चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तुमच्या प्रति÷sवर घाला घालण्याचा प्रयत्न होईल. मंगळवार, बुधवार सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे येऊ शकतात. अरेरावी करू नका. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवता येईल. कला, क्रीडा  क्षेत्रात नाराजी होऊ शकते. शिक्षणात कष्ट घ्या. यश लांब नाही. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. प्रसिद्धीचा प्रश्न करू नका.