|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार 

ऑनलाईन टीम /  पटना : 

 चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत नरेंद्र मोदीबोलत होते. यावेळी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.

‘सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण फक्त ‘देशाचा चौकीदार’ चोर आहे,’ अशी बोचरी टीका अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी केली होती. यावर नरेंद्र मोदी यांनी चौकीदार चोर नही चौकन्ना है, देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. याचबरोबर, गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात पुरावे मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचे  खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत? असा सवाल करत नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच,  आता भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसत नाही, तर ‘चुन चुन के बदला लेता हैं’ असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Related posts: