|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू? पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू? पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद:

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र अद्याप पाकिस्तान सरकारलने  अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेला मसूद अजहर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करायचा.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौलाना मसूद अजहरचा उल्लेख केला होता. अजहर पाकिस्तानात असून त्याची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. अजहरवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं. पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती.