|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाटणा साहिब येथूनच निवडणूक लढविणार : शत्रुघ्न

पाटणा साहिब येथूनच निवडणूक लढविणार : शत्रुघ्न 

पाटणा

 भाजपसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मतभेदांदरम्यान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी माझा मतदारसंघ बदलणार नाही. स्थिती कोणतीही असो, स्थान बदलणार नाही असे ते म्हणाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच शत्रुघ्न सिन्हा यांचे भाजप नेत्यांसोबत मतभेद सुरू आहेत.

  सिन्हा यांनी अनेकदा भाजपच्या विरोधात विधान केली आहेत. निश्चलीकरण आणि जीएसटीच्या निर्णयाबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. सिन्हा यांच्या पत्नी पुनम या देखील सक्रीय राजकारणात प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथून त्या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे आहे. पूनम सिन्हा दीर्घकाळापासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आणि त्यांच्या प्रत्येक कामाला प्रत्येक जण पसंत करतो. पुनम यांनी निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा असल्याचे शत्रुघ्न यांनी म्हटले आहे.

 

Related posts: