|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हरवळे रुद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हरवळे रुद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

प्रतिनिधी/ सांखळी

डिचोली तालुक्यातील महत्वाचे तीर्थस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानात काल महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.  यावेळी हजारो भाविकांनी रुद्रेश्वर देवास मुक्त अभिषेक केला. तसेच भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गेल्या अनेक वर्षापासून हरवळे येथे महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. देवस्थान समिती आणि सरकारी संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. भाविकांना स्नान करण्यासाठी धबधब्याला पाणी सोडण्यात आले होते. खेळणी, खाद्यपदार्थ, थंड पेय, चणे फुटाणे, घरगुती वस्तु आदी दुकाने थाटण्यात आली होती. देवस्थान अध्यक्ष यशवंत माडकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, स्वयंसेवक हजर होते.

यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व परिवार, सांखचे आमदार तथा उपसभापती डॉ. प्रमोद सावंत, सांखळी परिसरातील सरपंच, पंच, साखळी पालिका नगरध्यक्ष धर्मेश सगलानी, नगरसेवक, हरवळे सरपंच महेश दिवकर, सुरेश बायेकर यांच्यासह आदींनी श्री देव रुद्रेश्वरास मुक्त अभिषेक केला.

दर्शनासाठी भाविकांची लांबच्या लांब रांग लागली होती. यावेळी महिलांची मोठय़ा संख्येने सहभाग होता. याचबरोबर हरवळे येथील पवित्र धबधबा आटला होता. त्यामुळे खाणीच्या खंदकातील पाणी पंपिंग करून धबधब्याला सोडण्यात आल्याने भाविकांना स्नान करण्यास सोयीचे झाले.

 

Related posts: