|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » मला ट्रोल करणाऱयांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर

मला ट्रोल करणाऱयांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / अकोला :

मला ट्रोल करणाऱयांना ठोकून काढा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आता मी भूमिका बदलणार आहे. सुपारी घेऊन ट्रोल करणाऱयांना कार्यकर्ते बघतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

   पत्रकारांबद्दल बोलणार नाही. मात्र राजकीय लोकांबद्दलही ही भूमिका असणार आहे. मोठय़ा हुकूमशाहाशी लढण्यासाठी काही गोष्टी हुकूमशाहासारख्या कराव्या लागतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह संवेदनशील नव्हते. अमित शाहांनी हल्ल्याशी संबंधित वायरल केलेले फोटो 2005 मधील होते, असा दावाही आंबेडकरांनी केला. भाजपचा इतिहास विश्वासार्हतेचा नाही. भाजपबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.