|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय शेअर बाजारात तेजीची उसळी

भारतीय शेअर बाजारात तेजीची उसळी 

सेन्सेक्सची 378 अंकानी वधारला, टाटाचा निर्देशांक 7.72 झेपावला

मुंबई :

भारतीय शेअर बाजारात(बीएसई) नवीन सप्ताहातील पहिल्या दिवशी महाशिवरात्रीमुळे सुट्टी राहिली परंतु दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवारी नेहमीप्रमाणे बाजाराचा कारभार सुरु राहिला आणि त्यामध्ये दिवसभरातील व्यवहाराची उलाढाल पाहता भारतीय बाजारात (बीएसई) 379 अंकानी निर्देशांक तेजीत राहत 36,442 चा टप्पा गाठण्यात बाजाराला यश मिळाले. फायनान्सिअल, वीज आणि ऑटो या क्षेत्रात समधाकारक खरेदी झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. तर राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) चा निर्देशांक 124 अंकावर स्थिरावत 11,000 चा टप्पा पार केल्याची नोंद करण्यात आली.

मुख्य कंपन्यांनी मंगळवारी समधाकारक कामगिरी केली असून यात टाटासोबत हीरोमोटो कॉर्पचा निर्देशांक 5.28 व ऍक्सिस बँकेचा निर्देशांक 4.12 टक्क्यांनी मजबूत होत तेजीची नोंद केली आहे. ओन्जस, कोल इंडिया, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक यांच्या निर्देशांक 3.96 ने वधारल्याची नोंद करण्यात आली. तर इन्फोसिस 1.15, हिंदुस्थान युनिलिव्हर 0.62 आणि टीसीएस 0.19 टक्क्यांनी घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले.

मागील सप्ताहातील भारत -पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणावपुर्ण वातावरणाचा बराच फटका दोन्ही बाजाराना बसला होता, आणि त्यामुळे खुप दबावातच शेअर बाजारांची वाटचाल राहिली होती. तर तो तणाव सध्या निवळण्यास सुरुवात झाली असून आता लोकसभा निवडणूकाची घोषणा करण्यात येणार असून त्या घडामोडीवरच बाजाराचा प्रवास निश्चित होणार असल्याचे तज्ञांकडून मांडण्यात येत आहे.