|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

तुमचे ग्रह आमचा अंदाज

बुध. दि. 6 ते  12 मार्च 2019

मंगळ हर्षल युती अत्यंत स्फोटक

गेल्या 5 फेब्रुवारी 2019 पासून मेष राशीत हर्षल-मंगळ ठाण मांडून आहेत. या दोन ग्रहांची युती अत्यंत स्फोटक मानली जाते. त्याचा प्रभाव 22 मार्च 2019 पर्यंत राहील. त्यातही 19 ते 22 मार्च हा काळ जरा धोक्मयाचा ठरू शकेल. या काळात सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. बेंगलोरमधील एरोशोच्यावेळी झालेली दोन विमानांची टक्कर, बेंगलोर व चेन्नईतील कारगाडय़ांचा अग्निप्रलय तसेच पुलवामा येथील दहशतवाद्याच्या हल्ल्यात झालेला 40 जवानांचा मृत्यू व त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर व 300 दहशतवाद्यांचा खात्मा, आसाम व उत्तर भारतातील विषारी दारूचे पडलेले शेकडो बळी, यासह ठिकठिकाणी होत असलेले बस व रेल्वे अपघात, विजेच्या दुर्घटना यासह अनेक अचानक घडत असलेले प्रकोप हे सारे याच युतीचे परिणाम आहेत. वैयक्तिकदृष्टय़ा पाहू गेल्यास अचानक डोके भडकणे, भोसकाभोसकी, जाळपोळ, दंगली, अविचाराने  नको ते निर्णय घेणे, चांगले असलेले संबंध किरकोळ कारणावरून तोडून टाकणे व आपले नुकसान व गैरसमज करून घेणे, नको ते धाडस करणे, बेफिकीरीमुळे अथवा सुरक्षाविषयक उपाय न केल्याने अग्नि अथवा विजेच्या दुर्घटना, घटस्फोट, एकदम अंगावर धावून येणे, मोबाईलचे स्फोट, विमान, बोटी व आकाशस्थ पडणाऱया विजेमुळे अचानक हानी, व्यवसायात अचानक चढउतार, नुकसान यासह हजारो दुर्घटना या मंगळ-हर्षल योगावर घडत असतात. क्षुल्लक कारणावरून डोके तापून आत्महत्येसारख्या अथवा खुनाखुनीसारख्या घटना घडतात. काहीतरी दुरुस्ती अथवा धाडसी कामे करायला जाऊन जिवावरचे प्रसंग येतात, गंभीर अपघात होतात, यासाठी सर्वानी 22 मार्च पर्यंत जास्तीतजास्त सावध रहावे. हर्षल-मंगळ युतीचे काही चांगले गुणधर्मही दिसून येतात. गल्लीबोळात नाव माहीत नसलेले अचानक देशपातळीवर प्रसिद्धीस येतात. साध्या सायकलने फिरणारा विमानातून फिरू शकतो. साध्या नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास बुद्धिमत्ता अथवा दैवीकृपेच्या जोरावर एकदम उच्चपदस्थ नोकरी मिळते. बिघडलेले संबंध अचानक सुधारू शकतात. हरवलेल्या वस्तू अथवा व्यक्ती अचानक सापडू शकतात. पोट भरायची मारामार असलेल्यांना अचानक गडगंज संपत्ती मिळू शकते, पण चांगले घडण्यासाठी आपले पूर्वजन्माचे प्रारब्धही बलवान असावे लागते. आपण कितीही प्रयत्न केले तरी पूर्वजन्माच्या पुण्याईशिवाय माणसाला काहीही मिळत नाही, हे सूर्यप्रकाशातले स्वच्छ आहे. परमेश्वराने दोन किल्ल्या केलेल्या आहेत. प्रयत्नाची किल्ली मनुष्यप्राण्याला दिलेली आहे व त्याचं फळ काय द्यायचे ते तुमच्या पूर्वजन्माच्या पाप-पुण्याच्या हिशोबाची गोळा बेरजेची वजाबाकी करून त्या कर्माचे फळ परमेश्वर देत असतो. पुण्याचा साठा प्रमाणापेक्षा अधिक असेल तर झटपट व विनाविलंब त्याचे फळ मिळते व पापाचा साठा अधिक असेल तर काही तरी घटना घडून क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. बदललेल्या हर्षलचे परिणाम कसे असतात ते गेल्यावषीच्या खजानात दिलेले आहे. सध्या मंगळ-हर्षल-युती सुरू आहे. त्यामुळे मंगळाचा या हर्षलबरोबर सर्व राशीवर प्रभाव काय पडेल, हे समजण्यासाठी त्याच लेखातील माहिती जरा सुधारणा करून पुन्हा दिलेली आहे.

मेष-

हर्षल-मंगळ तुमच्या राशीतच आहेत. तापटपणा, उताविळपणा वाढण्याची शक्मयता आहे. व्यवसायात बदल होतील. नावलौकिक मिळेल. जन्मस्थळापासून दूर जाण्याची संधी. काही चमत्कारिक घटना घडून जीवनला निराळे वळण मिळेल. योग्य चातुर्य व बुद्धिमत्तेचा वापर केलात तर प्रचंड यश मिळवाल. जुन्या चालीरिती झुगारून पुरोगामी वृत्तीने वागाल. सूडवृत्ती, उतावळेपणा व अतिराग यावर नियंत्रण ठेवा.


वृषभ-

हर्षल-मंगळ राशीच्या 12 व्या स्थानी आहेत. या ठिकाणचे भ्रमण चांगले नसते. जीवनात काही ना काही चमत्कारिक घटना घडत राहतील. कष्टाचे प्रमाण वाढेल. अचानक काही समस्या उद्भवतील. सावध रहाणे हा रामबाण उपाय. सांपत्तिक अडचणी वाढतील. खर्च जपून करा. उधळपट्टीला लगाम घाला, अपघात, कलंक, सामाजिक संकटे, अचानक नुकसान, तसेच अज्ञात व्यक्तीकडून संकटे येतील काळजी घ्यावी.


मिथुन-

लाभातील मंगळ-हर्षल फार मोठे यश देईल. वाडवडिलांनी कमावली नसेल अशी प्रचंड संपत्ती मिळण्याचे योग. सर्व कामात यश मिळेल. स्वतःचे घर, वाहन, श्रीमंती, पैसाअडका होईल. उच्चस्थितीत रहाल. दूरचे प्रवास घडतील. थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे भाग्य उजळेल. तुमची परिस्थिती कितीही खराब असली तरी तुम्ही एकदम वर याल. अपघात, मारामाऱया, फसवणूक, अपघात, व्यसनी माणसे, बदनामी या प्रकारापासून जपा.


कर्क-

दशमात मंगळ-हर्षल युती आहे. नोकरी व्यवसायात अचानक बदल होण्याची शक्मयता, राजकारणात यश. कल्पकता व धैर्याने कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याची धडपड राहील. एखाद्याच्या चुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रात अपमान होण्याचे योग. नोकरी व्यवसायात बदल करावासा वाटेल. धंदा, कीर्ती, रोजगार, अधिकार याबाबतीत विलक्षण अनुभव येतील.


सिंह-

भाग्यात मंगळ-हर्षल असल्याने स्वभावात वैचित्र्य निर्माण होईल. सर्व महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास अनेकांची मदत मिळेल. दैवी साहाय्य मिळवाल, निवडणुकात भाग घ्या, यशस्वी व्हाल. स्वतंत्र बुद्धीने वागलात तर बरेच काही साध्य करू शकाल. पत्रिकेत परदेश गमनाचे योग असतील तर ते प्रत्यक्षात उतरतील तशी चांगली संधी येईल. योगाभ्यासात प्रगती होईल.


कन्या-

हर्षल-मंगळ असून हा काळ स्फोटक असतो. खर्च कमी करा, मन शांत ठेवावे लागेल. कोणत्याही बबातीत बेफिकीर राहू नका. अति विचार व रागावर नियंत्रण करणे टाळा. वाहन व विद्युत उपकरणे व अग्निसंदर्भातील कामे जपून करावीत, भावंडाकडून त्रास. आर्थिक बाबतीत नको तेथे गुंतवणूक करणे धोकादायक ठरेल. कुठेही लांबच्या प्रवासाला जाताना शक्मयतो एकटय़ाने जाऊ नका.


तूळ-

हर्षल-मंगळ आहेत. व्यवसायात चांगला फायदा, आर्थिक लाभ, किरकोळ कारण अथवा संशयीवृत्तीमुळे कौटुंबिक सुखाचा बोजवारा उडू देऊ नका. जोडीदाराच्या स्वभावात लहरीपणा निर्माण होईल. ध्यानीमनी नसताना विचित्र घटना घडून अचानक लग्न होणे, आंतरजातीय प्रेमविवाह, किंवा नको त्या प्रकरणात गुंतणे, असे अनुभव येतील. भागीदारी व्यवसाय असेल तर काळजी घ्या.


वृश्चिक-

हर्षल-मंगळ सहाव्या स्थानी आहेत. सर्व कामात अचानक मोठे यश. धर्म व दैववाद झिडकारून आपले वर्चस्व सिद्ध कराल. आयुष्यात कधी ऐकला नसाल, अनुभवला नसाल अशा चमत्कारी घटना घडतील. मानसिक चांचल्य वाढेल, न कळणारे आजार, बाधिक दोष वगैरेंची शक्मयता. किंमती वस्तूंची काळजी घ्या. तसेच शत्रूपिडा, कोर्ट मॅटरमध्ये अडचणी येणार नाहीत यासाठी दक्ष रहा. नोकरांचाकरावर फार विसंबून राहू नका.

धनु-

पंचमात मंगळ-हर्षल असल्याने खर्च वाढतील. संततीमुळे नको त्या प्रकरणात गुंतावे लागेल. शिक्षणामुळे नावलौकिक व सत्कार होतील. काहीवेळा लॉटरी, मटका, शेअरबाजार व तत्सम मार्गाने मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता. जीवनात काही विचित्र प्रकरणे होतील. त्यातील एखादे विवाहास पोषक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.


धनु-

चतुर्थात मंगळ-हर्षल असल्याने जमीन जुमल्याचे व्यवहार अचानक यशस्वी होतील, पण धोक्मयाच्या ठिकाणी सावध रहा. कौटुंबिक वातावरण नरम गरम राहील. घरातील व्यक्तीशी मतभेदाची शक्मयता. माता-पित्यांच्या दृष्टीने जपावे लागेल. बाधा होणे, अपघात, वीज पडणे, शॉक लागणे, पडझड यासारखे स्फोटक अनुभव येतील. राहत्या जागेत काही ना काही विचित्र अनुभव येतील. अचानक स्थलांतर अथवा जागेत बदल शक्मय.


कुंभ-

पराक्रमात हर्षल-मंगळ आहे. वडिलधाऱयांचे सर्व कार्यात चांगले सहकार्य मिळेल. जितके ऍक्टिव्ह रहाल तितके मोठे यश. नवनवीन कल्पना लढवाल व त्याचा चांगला फायदा होईल. विद्या व्यासंग वाढेल. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण होईल. अपघात शक्मयता असल्याने वाहन जपून चालवा. भावंडांच्या बाबतीत मतभेदाचे प्रसंग आले तरी संबंध चांगले ठेवा.


मीन-

धनस्थानी हर्षल-मंगळ हा योग अचानक मोठे खर्च दाखवितो. प्लॅनिंग करूनच खरेदी करा. आर्थिकस्थिती अस्थिर राहील. जोपर्यंत पैसा आहे, तोपर्यंत तो राखून ठेवावा. अचानक लाभ व अचानक नुकसान असे या ग्रहाचे गुण आहेत. काहीवेळा अनपेक्षित मोठा फायदा होईल. तर काहीवेळा मोठी हानी होईल. साध्यासुध्या ओळखीचे रूपांतर घनिष्ट संबंधात होण्याची शक्मयता. डोळय़ांची काळजी घ्या.