|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय असल्याचा गर्व; अफजल पुत्राचे उद्गार

भारतीय असल्याचा गर्व; अफजल पुत्राचे उद्गार 

दहशतवादाचा मार्ग स्वीकारण्यापासून आईने केले परावृत्त : वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा

  वृत्तसंस्था/ श्रीनगर

संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेल्प्प् दहशतवादी अफजल गुरुचा 18 वर्षीय पुत्र गालिब याने भारतीय असल्याबद्दल गर्व व्यक्त केला आहे. वडिलांना फासावर लटकविण्यात आल्यावर सूड घेण्यासाठी आपल्याला भरीस पाडण्यात येत होते, पण आईने दहशतवादापासून परावृत्त केल्याचे गालिबने प्रतिपादन केले आहे.

गालिबने 10 वी ते 12 वीच्या परीक्षेत अत्यंत चांगले गुण प्राप्त केले होते. गालिब सध्या 5 मे रोजी होणाऱया वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (नीट) तयारी करतोय. या परीक्षेनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड होईल, असा त्याला विश्वास आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास तो विदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छितो. विदेशात जाऊन शिक्षण घेणे आणि विदेशी विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी त्याला भारतीय पारपत्राची गरज आहे.

भारतीय असल्याबद्दल मला गर्व आहे. पारपत्र मिळाल्यास मला आणखीन गर्व होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. गालिब सध्या गुलशनाबाद येथे आजोबा गुलाम मुहम्मद आणि आई तबस्सुम यांच्यासोबत राहतोय.

दहशतवाद्यांकडून चिथावणी

अफजल गुरु यांना फासावर लटकविण्यात आल्यावर दहशतवादी संघटनांनी सूड घेण्यासाठी चिथावणी दिली होती. ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्नही झाला. आम्ही जुन्या चुकांपासून खूप काही शिकलो आहोत. केवळ आईमुळेच दहशतवादी झालो नसल्याचे गालिब सांगतो.

सुरक्षा कर्मचाऱयांचे प्रोत्साहन

गालिबच्या घरापासून केवळ 44 मीटर अंतरावर 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान गावाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या गावात दहशतवादी बुरहान वाणी मारला गेल्यावरही तणाव निर्माण झाला नव्हता. खोऱयात तैनात सुरक्षा कर्मचाऱयांशी अनेकदा भेट होते, त्यांनी कधीच त्रास दिलेला नाही. जवानांनी नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे गालिबने म्हटले आहे.