|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » गुरुग्राम जगातील सर्वात प्रदूषित शहर

गुरुग्राम जगातील सर्वात प्रदूषित शहर 

पहिल्या 5 मध्ये भारताच्या 4 शहरांचा समावेश : प्रदूषणामुळे जगाला मोठे आर्थिक नुकसान

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

हरियाणातील गुरुग्राम हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. आयक्यू एअरव्हिज्युअल आणि ग्रीनपीसच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. तर जगाच्या पहिल्या 10 प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या 7 शहरांचा समावेश आहे. पहिल्या 5 मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबाद व्यतिरिक्त 4 शहरे भारतातील आहेत.

 प्रदूषणाचे आकलन पीएम 2.5 कणांच्या आधारावर करण्यात आला आहे. प्रदूषणाचे विशेष दुष्परिणाम होत असतात. आमचे आरोग्य आणि खिशावर प्रदूषणाचा प्रभाव पडत असतो. प्रदूषणामुळे अनेकांना जीवन गमवावे लागले असून जगाला अंदाजे 225 अब्ज डॉलसचे (सुमारे 15 लाख कोटी रुपये) नुकसान झाले असून कोटय़वधी डॉलर्स औषध तसेच उपचारांवर खर्च झाल्याचे उद्गार ग्रीनसचे दक्षिण-पूर्व आशियाचे कार्यकारी संचालक येब सानो यांनी काढले आहेत.

भारत जगातील सर्वात वेगाने वृद्धिंगत होणाऱया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताची 22 शहरे सामील आहेत. चीनची 5, पाकची दोन आणि बांगलादेशचे एक शहर यात सामील आहे. जागतिक बँकेनुसार प्रदूषणामुळे भारताच्या जीडीपीला 8.5 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे प्रदूषणाची पातळी कमी करण्यास चीनला मागील काही काळात विशेष यश प्राप्त झाले आहे. चीनमध्ये 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये प्रदूषणाच्या पातळीत 12 टक्क्यांची भरीव घट दिसून आली आहे. चालू आठवडय़ात नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्ष क्षी जिनपिंग हे प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी संदेश देणार असल्याचे बोलले जात आहे.

वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 70 लाख जणांचा मृत्यू

घरात तसेच बाहेर होणाऱया वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 70 लाख जणांचा अकाली मृत्यू होत असून यात 6 लाख मुलांचा समावेश असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण विषयक तज्ञ डेव्हिड बोयड यांनी केला आहे. सुमारे 6 अब्ज लोक नियमितपणे अत्यंत प्रदूषित हवेत श्वसन करत असल्याने त्यांचे जीवन आणि आरोग्य जोखीमयुक्त ठरले आहे. दर तासाला 800 लोक मारले जात असून यातील अनेक जण यातना सहन करून कित्येक वर्षांनी मृत्युमुखी पडत आहेत. कर्करोग, श्वसनविकार किंवा हृदयरोग हे प्रदूषित हवेत श्वसन केल्यामुळेच होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशात रालोदला

Related posts: