|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » फेसबुक जाहिरातींवर भाजपने केला सर्वाधिक खर्च

फेसबुक जाहिरातींवर भाजपने केला सर्वाधिक खर्च 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मिडीयातील जाहिरातबाजीवर भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक खर्च केला आहे. निवडणुका जवळ येत असल्याने सोशल मिडीयावर खर्च करण्याकडे राजकीय पक्षांचा कल वाढताना पाहायला मिळत आहे.

    फेसबुकच्या फेब्रुवारी महिन्याच्या डेटानुसार, भाजप आणि त्यांच्या सहकाऱयांनी फेसबुकवर राजकीय जाहिरातबाजीसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. प्रादेशिक पक्षही सोशल मिडीयावरील जाहिरातबाजीमध्ये मागे नाही. राजकीय जाहिरातींमध्ये व्यक्ती, खासदार, आमदार, संघटना, पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राजकीय जाहिरातबाजीला वेग आला आहे. ज्याक्षणी आचारसंहिता लागू होईल त्यानंतर सोशल मिडीयावरील जाहिरातबाजींवर निवडणूक आयोगाकडून चाप बसेल. 

     भाजपने फेसबुकवर फेब्रुवारी महिन्यात 2 करोड 37 लाख एवढी रक्कम खर्च केली. तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी 10 लाख 60 हजार रूपये खर्च केलेत. प्रादेशिक पक्षांनी फेसबुकवरील जाहिरातबाजीसाठी 19 लाख 80 हजार खर्च केल्याची आकडेवारी यात समाविष्ट केली आहे. प्रादेशिक पक्षांच्या यादीत बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तेलगु देसम पार्टी, वाईएसआर काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश आहे.