|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय सैन्याकडून 10 घातक गन्सचा वापर

भारतीय सैन्याकडून 10 घातक गन्सचा वापर 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ले घडवून आणले आहेत. या कारवाईनंतर शत्रूच्या विरोधात भारतीय संरक्षण दलांकडून जी शस्त्रास्त्रs वापरली जातात, त्याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. भारतीय सैन्य जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य मानले जाते. सामर्थ्यशाली असल्यामुळे शत्रूला लक्ष्य करण्यासाठी सैन्य घातक शस्त्रांचा वापर करते. यात गन्स, रायफल्स आणि बंदूकांचा देखील समावेश आहे.

1 पिस्टल ऑटो 9एमएम 1ए

पिस्टल ऑटो 9एमएम 1ए भारतीय सशस्त्र दलांमध्ये सर्वाधिक वापरले जाते. सैन्य, केंद्रीय सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलीस दलांमध्ये सेवा शस्त्र म्हणून याचा वापर होतो. हे सेमी ऑटोमॅटिक आणि सेल्फ लोडिंग पिस्टल असून यात 9 गुणिले 19 एमएमच्या गोळीचा वापर होतो. याच्या मॅगजीनमध्ये 13 राउंड गोळय़ा झाडण्याची क्षमता आहे. याची निर्मिती रायफल फॅक्टरी ईशापूरमध्ये होते.

2 इंसास रायफल

याचा वापर सैन्यासोबतच अन्य सशस्त्र दलांकडून केला जाते. याचे पूर्ण नाव इंडियन स्मॉल आर्म सिस्टीम असून याचे कॅलिवर 5.56 एमएम आहे. याची संरचना एके-47 च्या धर्तीवर करण्यात आली आहे. 1999 च्या कारगिल युद्धात सर्वप्रथम याचा वापर झाला होता. अन्य शस्त्रांच्या तुलनेत हलके असल्याने हाताळण्यास आणि गोळीबार करण्यास सुलभता प्राप्त होते.

3 एके-203 रायफल

एके-203 रायफल्सचा वापर दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात केला जाईल. ही रायफल इंसासची जागा घेणार आहे. याच्या मॅगजीनमध्ये 30 गोळय़ा असतील, इंसासच्या तुलनेत ही रायफल अधिक हलकी आणि छोटय़ा आकाराची असेल. यातून सेकंदाला 10 गोळय़ा झाडता येणार आहेत.

4 एकेएम असॉल्ट रायफल

रशियाकडून आयात तंत्रज्ञानाच्या आधारावर याची निर्मिती झाली आहे. एके-47 ची आधुनिक आणि सुधारित आवृत्ती असलेली ही गन प्रतिमिनिटाला 600 राउंड फायर करते. बंदूकांच्या एके साखळीत जगभरात सर्वात व्यापकपणे वापरली जाणारी ही असॉल्ट रायफल आहे. याचा वापर सैन्य, निमलष्करी दल, बीएसएफ, एनएसजी आणि अन्य सशस्त्र दले करतात.