|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ओझरे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार.. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले.

ओझरे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार.. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले. 

प्रतिनिधी /मेढा :

ओझरे गावात अनेक विधायक उपक्रम सुरू असून या गावाने आजपर्यंत आम्हांला महत्त्वपूर्ण साथ केली आहे.त्यामुळे या गावाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे प्रतिपादन सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.ओझरे ता.जावली या गावातील विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ त्यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे उपस्थित होते.यावेळी जावलीचे माजी सभापती मानसिंगराव मर्ढेकर,कांतीभाई देशमुख,मच्छिंद्रनाथ क्षीरसागर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता डी.व्ही.पाटील,शिवाजीराव घोरपडे,पोलिस पाटील अनिता लकडे,सरपंच रुपाली जंगम,उपसरपंच अजित मर्ढेकर,केंजळचे सरपंच संतोष केंजळे,केसकरवाडीचे सरपंच सुरेश केसकर,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव,राजू खुडे,पत्रकार भास्करराव धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ओझरे गावासाठी 60 लाखाची राष्ट्रीय पेयजल योजना,12 लाखाची ग्रामपंचायत इमारत,10लाखाचा गावरस्ता,5 लाखाचा दलित वस्ती रस्ता,5 लाखाची विद्युत डी.पी,या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे त्याचे भूमीपूजन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंदीस्त गटर योजना,मागासवर्गीय वस्ती अंतर्गत काँक्रीटीकरण,घर तिथे शोषखड्डा या कामांचा शुभारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,वसंतराव मानकुमरे व  मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले  म्हणाले,शिवाजीराव घोरपडे यांच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी ओझरे गावच्या विकास कामासंबंधी झालेल्या चर्चेनुसार ओझरे गावचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी सर्वाधिक निधी मंजूर केला असून या गावच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य केले जाईल.यावेळी वसंतराव मानकुमरे हे मार्गदर्शन करताना म्हणाले, आमदारांच्या नेतृत्वाखाली जावली तालुक्यात मोठय़ा प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.ओझरे गावाने सातत्याने आम्हांला साथ दिली असून ओझरे गावासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.