|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित 

ऑनलाईन टीम / बिकानेर :

राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेरजवळ भारतीय हवाई दलाचे मिग विमान कोसळले. यावेळी विमानातून पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडला. दरम्यान, घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे अधिकारी दाखल झाले असून विमान कोणत्या कारण्यामुळे कोसळले याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरला जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे अपघात झाला होता. या अपघात दोन पायलट शाहिद झाले. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले होते.

 

Related posts: