|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात 0.05 टक्क्यांनी घट

एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात 0.05 टक्क्यांनी घट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक म्हणून एचडीएफसीला ओळखले जाते. या व्याजदराचा फायदा दोन किंवा तीन वर्षाकरीता कर्जाच्या एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांनी घट करत क्रमशः 8.85 टक्के आणि नऊ टक्के व्याजदर होणार आहे. बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनूसार नवीन व्याजदर सात मार्चपासून लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

बँकेकडून सादर करण्यात आलेल्या व्याजदर कपातीनंतर ठराविक कालावधीसाठी देण्यात येणारे व्याजदर पुढील प्रमाणे एक दिवस, एक महिना, तीन महिना, सहा महिने आणि एक वर्षाकरीत साधारण 8.35, 8.4, 8.45, 8.55 आणि 8.75 टक्के अशी व्याजदर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सांगण्यात आले आहे. 

आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत

आरबीआयकडून सादर करण्यात आलेल्या व्याजदर कपातीनंतर बँका आपले नवीन व्याजदर प्रसिद्ध करणात  आहेत. त्याचाच हा भाग म्हणून एचडीएफसी बँकेनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचे दिसून येत आहे.

Related posts: