|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चोऱया रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

चोऱया रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे 

प्रतिनिधी / बेळगाव

शहर व उपनगरातील वाढत्या चोऱया व घरफोडय़ा रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. उद्यमबाग पोलिसांनी रविवारी राणी चन्नम्मानगर परिसरात नागरिकांची बैठक घेऊन सूचना केली.

उद्यमबागचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील, उपनिरीक्षक बी. एस. कुलीगोड, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. चोऱया रोखण्यासाठी नागरिकांनी काय करावे, पोलीस दलाला कशा पद्धतीने सहकार्य करावे, कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात आली.

खास करून आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सल्ला पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी दिला. रात्रीच्यावेळी घराबाहेरचे दिवे लावावेत. पैसे, दागिने घरात न ठेवता लॉकरमध्ये ठेवावेत, आपल्या परिसरात फिरणाऱया संशयास्पद व्यक्तींविषयी जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

यावेळी अधिकाऱयांनी सुरक्षिततेवर कसे भर द्यायचे, याविषयी नागरिकांना माहिती दिली. किंमती ऐवज, दागिने व मोठी रक्कम घरात ठेवणे धोक्मयाचे असते. त्यामुळे शक्मयतो ते लॉकरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित ठरते. गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरुच असतात. नागरिकही सतर्क राहिल्यास पोलीस दलाला ते मदतीचे ठरणार आहे, असे पोलीस अधिकाऱयांनी नागरिकांना सांगितले..