|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी 14 मार्च निकाल

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी 14 मार्च निकाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय 14 मार्चला निकाल देणार आहे. समझोता एक्सप्रेस ही भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी साप्ताहिक टेन आहे. 18 फेब्रुवारी 2007 रोजी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात बहुसंख्य प्रवासी पाकिस्तानी नागरीक होते.

 

पाकिस्तानी मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या हेतूने बॉम्बस्फोट घडवण्यात आला असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. समझोता एक्सप्रेस पानिपत जवळील दिवानी गावामध्ये असताना हा बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी अटारीच्या दिशेने ही टेन जात होती. या टेनचे अटारी हे भारतातील शेवटचे स्थानक आहे. अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य असीमानंद यांना या बॉम्बस्फोटात आरोपी बनवण्यात आले होते. लोकेश शर्मा, सुनील जोशी, संदीप डांगे आणि रामचंद्र कालासांग्रा याचे नाव सुद्धा आरोपत्रात होते. या स्फोटाचा मास्टरमाईंड सुनील जोशी 2007 साली मध्य प्रदेश देवास येथे मृतावस्थेत सापडला.

 

 

 

Related posts: