|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात गेमिंग स्मार्टफोन ‘ब्लॅक शार्क-2’ होणार सादर

भारतात गेमिंग स्मार्टफोन ‘ब्लॅक शार्क-2’ होणार सादर 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मोबाइल गेमिंगच्या चाहत्यांना ब्लॅक शार्कने नेक्स जनरेशन ब्लॅक शार्क 2 सादर करण्याचे ठरविले आहे. याबाबत कंपनीने व्हीबोवर टीझर पोस्टरमधून अधिकृत घोषणा केली आहे. या फोनला 18 मार्च रोजी सादर होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सादर केलेल्या ब्लॅक शार्क हॅलोनंतर काही अपग्रेडेटसह हा फोन सादर केला जाणार आहे. लवकरच हा भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. भारतात मोबाइल गेमिंग वापरकर्त्यांची संख्या जास्त असल्याने हा फोन भारतात सादर होणार आहे.

ब्लॅक शार्क 2 मध्ये लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रगन एसओसी प्रोसेसर असणार आहे. तसेच 8 जीबी आणि 12 जीबी रॅम असे दोन पर्याय यात उपलब्ध करण्यात येणार आहेत. हा फोन सुपीरियर लिक्विड कुलिंग 3.0 टेक्नॉलॉजीसह सादर होईल.

 तसेच 18 मार्चच्या दरम्यान यासंबंधीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे शाओमीच्या टीझरने स्पष्ट केले आहे.